महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून विक्रांत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरत सर्वसामांन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
विक्रांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली. विद्यार्थ्यांची अतिरिक्त परिक्षा फी असेल किंवा महाविद्यालयाची वार्षिक फी असेल, यातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येणार नाही यासाठी त्यांची सर्वोतोपरी मदत केली.
विक्रांत पाटील यांनी भाजपाच्या अंत्योद्याच्या विचारांवर चालत सर्वांना सोबत घेऊन अनेकांना न्याय मिळवून दिला. तसेच सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.
विक्रांत पाटील यांनी युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले.तसेच अनेकांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केला.
विक्रांत पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून काम करत असताना महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांसाठी विविध उपक्रम, मार्गदर्शन शिबीरे राबवली.
भारतीय जनता पार्टी, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश
मा.उपमहापौर, मा.नगरसेवक पनवेल महानगरपालिका
विक्रांत पाटील यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी आणि युवांचे असंख्य प्रश्न कायमच मनाला वेदना देत होते, त्यामुळे या विषयावर काम केले पाहिजे असं मनाशी घट्ट करून बाहेर राहून केवळ बघत राहण्या पेक्षा प्रत्यक्ष या प्रक्रियेत उतरून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल का हा विचार मनात ठेवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीची सर्वसमावेशक विचारधारा आणि शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसेपर्यंत कार्य करत राहण्याची पंडित दिनद्याल उपाध्याय यांची अंत्योद्याची शिकवण याने प्रभावित होऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाची मंडल स्तरावरची पहिली जबाबदारी स्विकारली.
युवांच्या अनेक विषयांमध्ये काम केल्याने आत्मविश्वास वाढला व यानंतर २०१० साली थेट भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी विक्रांत यांच्यावर सोपवण्यात आली.

एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणारे विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणारे विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...