Mahesh Shinde

बद्दल

व्यक्तीमत्वाबद्दल

श्री.महेश संभाजीराव शिंदे

आमदार, कोरेगांव विधानसभा

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी प्रश्नांवर काम करत महेश शिंदे यांनी विद्यार्थी दशेपासूनच जनसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली.याच दरम्यान शैक्षणिक, सामाजिक आणि शेती विषयक क्षेत्राला जवळून अनुभवत त्यासंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी कंबर कसली. संपूर्ण कोरेगांव तालुका आणि आजूबाजूची गावं अक्षरश: पिंजून काढली. अतिशय कमी वयात विविध प्रश्नांना वाचा फोडत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा उभारला. यातून तगडा जनसंपर्क तयार होऊ लागला. यानंतर सामाजिक प्रश्नांना हात घालत युवकांसाठी व्यायामशाळांची उभारणी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, महिला सशक्तीकरणासाठी महिला बचत गटांना मदतीचा हात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा यांसारख्या अगणित गोष्टींमधून सर्वसामांन्यांचे प्रश्न सोडवले. घरात कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना सक्रिय राजकारणात प्रवेश करत प्रस्तापितांची मक्तेदारी मोडीत काढली आणि महेश शिंदे यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. २००७ ते २०१२ या कालावधीत खटाव जिल्हा परिषदवर त्यांनी काम केलं. यानंतर काही काळ जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले. यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूकीत उभे राहत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले आणि लोकनियुक्त आमदार म्हणून थेट विधानसभेत गेले.

श्री.महेश संभाजीराव शिंदे
आमदार, कोरेगांव विधानसभा

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा चेहरा

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार महेशजी शिंदे यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपले मन:पूर्वक स्वागत!

शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी आजवर अनेक शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. शिवाय मतदारसंघातील शाळांचे नुतूनीकरण करणे, शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिकीकरण आणणे यांसारख्या बाबींवर देखील त्यांनी काम केले आहे.

सामाजिक

गावागाड्यांमधील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडली.गावागाड्यातील रस्ते, पाण्याच्या टाक्या, धार्मिक स्थळे, सुशोभिकरणाच्या बाबी, स्मशानभूमी डागडुजी, पाठबंधाऱ्यांची बांधणी यांसारख्या सामाजिक कामांना पूर्णत्वास नेत विकासकामांना गती आणली.

युवा सशक्तीकरण

गावागावातील व्यायामशाळांना पुर्नजीवित करून युवकांच्या शरीर यष्ठीसाठी त्या लोकार्पित केल्या.शिवाय युवकांच्या रोजगारांसाठी रोजगार मेळावे आयोजित करून मतदारसंघातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला.स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरूण-तरूणांसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत प्रोत्साहित केले.

महिला सक्षमीकरण

गावोगावातील महिला बचत गटांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देत बचत गटांना उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय महिला गृह उद्योगांच्या माध्यमातून महिला सबलीकरणास हातभार लावला.

टाइम लाइन